लाभार्थी
होय मी लाभार्थी,या सरकारचा
हे माझं ---------------सरकार
केलीत तुम्ही अचानक नोटबंदी
घोटाळे बाजांनीच साधली संधी
शेती मालाला तर हाय मंदीच मंदी
तुम्ही जाहिरातीची सोडू नका एकही संधी
होय मी शेतकरी ,लाभार्थी या सरकारचा
हे माझं -----------सरकार
कच्या तेलाच्या बॅरलची, कमी झाली किंमत
पेट्रोल ,गॅस दर वाढीचे निर्णय,
बघा तुमची हिंम्मत
काय लावलीय राव तुम्ही,
सर्व समान्य लोकांची गंमत
होय मी सर्वसामान्य ,लाभार्थी या सरकारचा
हे माझं ---------------सरकार
प्राथमिक शिक्षणाचा तर झालाय
सगळाच बट्ट्याबोळ
बदल्या च्या निर्णयात तर
सगळा घोळात घोळ
मुलांच्या समोर वाचू द्या
शिक्षकांना एखादी तरी ओळ
होय मी शिक्षक ,लाभार्थी या सरकारचा
हे माझं ----------------सरकार
जी एस टी,सी एस टी तुमचे करच कर
इथं भलं मोठं कर्जाचे ओझं
आमच्या डोक्यावर
अन बसलो आम्ही तुमच्या
स्वप्नांच्या झोक्यावर
पण क्षणात आणलं तुम्ही
आम्हाला जमिनीवर
होय मी व्यापारी, लाभार्थी या सरकारचा
हे माझं ------------------सरकार
महागाईचा सगळीकडेच होतोय
रोजच्या रोजच भडका
आमच्याजवळ ना रोजगार ना पैसे अडका
घ्याव्यात का सांगा दगडाला धडका
आम्हा तरुणांच्या डोक्याचा केलाय
तुम्ही मातीचा मडका
होय मी एक तरुण,लाभार्थी या सरकारचा
हे माझं------------------सरकार
दुसरीकडं ऊसाला जादा,मिळू शकतो भाव
तुम्हाला मात्र सगळं आपल्यालाच ,
असावं अशीच सारी हाव
आंदोलनानं ऊस उत्पादकांची
ऊस पिकवून ही होतेय धावाधाव
अन तुम्ही म्हणता,विकासाचं केंद्र
मानलंय आम्ही तुमचं गाव
होय मी ऊस उत्पादक,लाभार्थी या सरकारचा
हे माझं---------------------- सरकार
कर्जमुक्तीची घोषणा दिलीत तुम्ही धाडून
पात्र लाभार्थी यादी पाहून
घ्यावीत का आमची डोकी फोडून
का घ्यावे आमचे आम्ही
स्वतःला काळ्या आईच्या पोटात गाडून
होय मी कर्जदार,लाभार्थी या सरकारचा
हे माझं ------------------------सरकार
कवि
श्री.युवराज गोवर्धन जगताप
९२१/१/६ प्लॉट नं १२ वायकुळे प्लॉट
उपळाई रोड बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर
मो.नं. 9405237081
ई-मेल jagtap.yuva@gmail.com
(कवीचे कविते बाबत स्पष्टिकरण
सदर कविता ही भारतातील कोणत्याही
राज्यसरकार वर नसून हे कवीचे स्वतःचे
सरकार आहे या कवितेचा कोणत्याही
सरकारशी संबंध नाही
संबंध आल्यास तो योगायोग समजावा)