बुधवार, १७ मार्च, २०२१

व्यसन (कविता)

              व्यसन 

दुष्परिणाम व  व्यसनमुक्ती 


व्यसनाची हो वाट।जीवनास नाट।।

होते बरबादी । आयुष्याची ।।


सिगारेटचा तो धूर।फुफुस चक्काचूर।।

बेडके,खोकल्यास। आमंत्रण सर्वदा।।


तंबाखूचा तो विडा।सडवी जबडा।।

कॅन्सरला आमंत्रण । देई जे ।।


दारूची ती नशा । मोह हवा कशा ।।

पडती आतड्यास भोके। आपल्याची ।।


पुडी ती गुटख्याची । दुर्गंधी तोंडाची ।।

समोरचा न थांबे । आपल्यापुढे ।।।


माव्याची ती सुपारी । दाततोंड रंगवी ।।

बोलताच बत्तीशी दिसे। काळीकुट्ट ।।


नका पिऊ दारू । जीवन सुधारू ।।

उधळू आनंदी आनंद । चौफेर ।।


बिडी,सिगारेट, गांजा । धुराचा लोट ।।

ठेवावा दुरचं सदा ।सर्वांनी ।।


गुटखा,मावा,सुपारी । सगळे विषारी ।।

तोंडाचे वाटोळे करता । कशापायी ।।


तंबाखू ला चुना । नाका आता लावू ।।

राखू मुख आरोग्य । अबाधित ।।


सोडूनी धूम्रपान  । काढूनी घाण ।।

जगुया जीवन । आनंदाने।।



                 कवि

श्री. युवराज गोवर्धन जगताप (बार्शी)

              9405237081




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...