बुधवार, १७ मार्च, २०२१

हिरवं सपानं (कविता)

 हिरवं सपानं


धान्य पेरूनी

ओटी तुझी भरीतो

काळ्या मातीत

हिरवं सपानं पाहतो


काळ्या मातीत

आलं धान छान

मी गातोय हिरवं

हिरवाईचं गुणगान


काळी धरणी नेसली

हिरवा शालू

माझं सपानं बघ

लागलया फुलू


काळ्या मातीचा

थाटचं हाय न्यारा

हिरव्या सपनात माझ्या

हिरवाच भरलाय वारा


हिरव्या रानात

कणीस ताटाले डूलतं

पीक पाहुनी मन

आनंदी आनंदे झुलतं


टच दानं कणसा

कणसात दाटलं

मनी आलयं उधानं

घर धान्यानं भरलं


                   कवि

श्री. युवराज गोवर्धन जगताप

        (काटेगाव ता.बार्शी)

          9405237081






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...