बुधवार, १७ मार्च, २०२१

काव्य म्हणजे --? (कविता)

काव्य म्हणजे --?


काव्य म्हणजे ---

आंधळ्याचा डोळा 

शब्दांचा सोहळा 


काव्य म्हणजे ---

शब्द  मोत्यांचा हार

शब्दांचा  प्रहार


काव्य म्हणजे ---

प्रस्थापितांची भाकरी

नवोदितांची उमेदवारी 


काव्य म्हणजे ---

दारिद्र्याचे चटके

राजकारण्यावर फटके


काव्य म्हणजे ---

अग्नितील आग

सामाजिक  विषयांवर  राग


काव्य म्हणजे ---

सूर्याचा पारा

नैतिकतेला सहारा


काव्य म्हणजे ---

विचारांच्या गारा

शब्दांचा  मारा


काव्य म्हणजे ---

चंद्राचा डाग

व्यवस्थेवर राग


काव्य म्हणजे ---

पांगळ्याचा पाय

ह्रदयाची हाय


काव्य म्हणजे ---

दुधाची साय

कवीची माय


                 कवि

श्री. युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव  ता:- बार्शी

         9405237081

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...