बुधवार, १७ मार्च, २०२१

पाणी मनानं वाहिलं (कविता)

 "पाणी मनानं वाहिलं"


माय तुझ्या पायाचं

रक्त मी पाहिलं

माझ्या डोळ्याचं

पाणी मनानं वाहिलं


रानं सारं तुडवलं

नाही पाया पाहिलं

तुझ्या वेदनेचं गाणं

रक्तानचं गायलं


माती न्हाली रक्तानं 

तिला नाही पाहिलं

शेती मातीच्या कष्टानं

जीनं सारं कष्टाले वाहीलं


माय तुझ्या संसाराचं

होईल बघ सोनं

संसारी तुझ्या राहणार 

नाही काही काही उनं


रस्त्यात तुझ्या

वाटतं नसावं काटं

पायदळी अंथरावं

माझ्या कातड्याचा पाटं


                 कवि

श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:- बार्शी

       9405237081





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...