बुधवार, १७ मार्च, २०२१

बापू (दर्पण काव्य प्रकार)

 

बापू (दर्पण काव्य प्रकार)

बापू
भक्त अहिंसेचे

बापू
राष्ट्राचे पिता
पुरस्कर्ते सत्याचे

बापू
स्वातंत्र्य संग्रामातील
संयमी व्यक्तिमत्व
प्रतिक अस्तेयाचे

बापू
स्वतःचे शील
संभाळ करणारे
मवाळवादी,स्वावलंबी,
पूजक ब्रम्हचर्याचे

बापू
गरजेपेक्षा अधिक
पैसा, संपत्ती,
साठा करू
नका विचार
प्रेरक अपरिग्रहाचे

बापू

श्री.युवराज गोवर्धन जगताप
     काटेगाव ता:-बार्शी
    9405237081

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...