हुंडा मागणी
लग्न मुलीचं करण्या
जित्यापनी बाप मरे
वर पित्याची मागणी
पूर्ण करण्या रे झुरे
नावाखाली रे हुंड्याच्या
मागे वरबाप सोने
नाही घेत आम्ही हुंडा
किती दुटप्पी बोलणे
होते वराची मागणी
पैसा, सोने,वाहनांची
पूर्ण करण्या मागणी
दमछाक रे बापाची
गोळा पोटचा सांभाळी
रान करुनि जीवाचे
वर पिता घेतो हुंडा
तोडी लचके बापाचे
सुखी रहावे लेकरू
शेती गहाण ठेवितो
हुंडा देऊन लेकीला
सारा संसार जाळीतो
आहे परी हुंडा बंदी
होते मागणी हुंड्याची
नका घेऊ नका देऊ
आहे गरज काळाची
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:-बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा