बुधवार, १७ मार्च, २०२१

प्रेम (कविता)

        प्रेम


प्रेम शरीराच्या

तृष्णेवर करावे 

वासनेवर नको


प्रेम डोळ्याच्या 

नजरेवर करावे

वासनांधतेवर नको


प्रेम चेहऱ्याच्या 

गालावर करावे

प्रसाधनांच्या

लेपावर नको


प्रेम शरीराच्या

अंतरमनावर करावे

उपभोग्य देहावर नको


प्रेम मनाच्या

गाभाऱ्यावर करावे

वासनेच्या वादळावर नको


प्रेम शरीर मनाच्या

अंतकर्णावर करावे

प्रणय आगीवर नको


              कवि

श्री. युवराज गोवर्धन जगताप

        (काटेगाव ता.बार्शी)

          9405237081













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...