"एप्रिल फूल"
हातात पिशवी
कडेवर छोटे मूल
नयनी तिला पाहता
खुलला माझा जीव
स्वप्नातला होता
हा सत्यरूपी भास
मला तिला भेटायची
लागली होती आस
तिनं हाक मारून घरी
म्हणाली तू आता जेव
मनोमन मला वाटले
पावला आता मला देव
मुलाकडे पाहत ती
हळूच म्हणाली हे मुलं
हे ऐकून धक्क्यानं
माझी बत्ती झाली गुल
ती हसून म्हणाली
ते जावेचे आहे मूल
माझा झाला मामा
तिनं केलं एप्रिल फूल
श्री. युवराज गोवर्धन जगताप (बार्शी)
9405237081
दि:- ०१/०४/२०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा