बुधवार, १७ मार्च, २०२१

वाघीनी सारखं वाग (कविता)

 वाघीनी सारखं वाग


वाघीण म्हणून जन्मलीस

वाघिणीसारखं वाग--------


वाघिणीची कातडी तुझी

शेळी सारखी राहतेस का ?

चौकातिल चार कुत्र्यांची 

शिकार होतेस का ?-------


एकदा वाघिणीची एकदा 

फोड डरकाळी

वासनांध कुत्र्यांची 

कर राखरांगोळी----


नको वाटतो का तुला

गर्दीतून चालताना धक्के 

देणाऱ्यांशी घ्यायचा पंगा

शेळीच्या बुरख्यातून 

बाहेर पड

अन तुझ्या पंजाचा

एकदाच दाव त्यांना इंगा-----


का तुझ्याच मनात

उठलीय धांदल

म्हणूनच येणारे जाणारे

करताहेत तुझी टिंगल

असं जर नसेल तर

बोटी बोटी करून

बांध त्यांचं बंडल------


                   कवि


श्री. युवराज गोवर्धन जगताप(बार्शी)


पत्ता:- ९२१/०१/६  प्लॉट नं- १२


        वायकुळे प्लॉट उपळाई रोड बार्शी


        ता:- बार्शी जि:- सोलापूर


        मो.नं.    9405237081


         ई-मेल    jagtap.yuva@gmail.com


         व्यवसाय:-  नोकरी (प्राथमिक शिक्षक)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...