वैशाख ऊन (हायकू)
वैशाख ऊन
सूर्य आग ओकतो
मी लहाकतो
सूर्याचा पारा
पसार वारा होई
डागण्या देई
किरणे तप्त
बसे चटके अंगा
घामाच्या गंगा
भुई तापली
होते आग पायाची
लाही जीवाची
घसा कोरडा
तहान लागे जीवा
थंडावा हवा
तापले ऊन
डोळ्यापुढे अंधार
येई चक्कर
उन्हाच्या झळा
होई जीव व्याकुळ
उष्णता जाळ
डोक्यास ऊन
खूपच खूप पोळे
कातडे जळे
कवि
श्री. युवराज गोवर्धन जगताप
(काटेगाव ता.बार्शी)
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा