वेड सेल्फीचे (काव्यांजली)
मोबाईल वेडी
तरुण पिढी सारी
संकट दारी
घेऊनिया
वेड सेल्फीचे
दुनियेस फार लागले
जीव गेले
कितीतरी
जीव झाला
सर्वांचा आता स्वस्त
सेल्फीत व्यस्त
तरुणाई
सेल्फीचा नाद
नाही हो बरा
स्वतःच मरा
दरीत
जीवाची पर्वा
नाही आता कुणा
खेळ जीवघेणा
कशापायी
मरणाच्या दारी
सेल्फी घेऊन जाई
कशाला घाई
अंताची
सावरा जीवा
थोडे आवरा मन
नाही जीवन
पुन्हापुन्हा
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता :- बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा