बुधवार, १७ मार्च, २०२१

"एक मागणं " (कविता)

 

"एक मागणं "

सगळं सुखचं
नको देऊ देवा
दुःखाची ही टोचणी 
टोचू दे जीवा

जीवनात असावीच
संकटाची नाजूक कळ 
तरच सुखासाठी आणिन
देहात मी बळ

सुखाचा सागरचं
जर मिळाला मला
नाही मिळणारचं
दुःख कधी पहायला 

मिळालं सहज सगळं च
नाही जीवनास अर्थ
संकटाशिवाय जगणं म्हणजे 
जीवन ही व्यर्थ 

जीवनात समस्यांची 
असावीच जळजळ 
तरच प्रयत्नांची
राहिल सुरु वळवळ

वास खमंग भाकरीचा
जेव्हा तापतो तवा 
सुलाखून निघू दे
देह माझा देवा

श्री.युवराज गोवर्धन जगताप
     काटेगाव ता :- बार्शी
      940523781

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...