बुधवार, १७ मार्च, २०२१

शब्द (कविता)

      शब्द


शब्द  हसवतात

शब्द फसवतात


शब्द मारतात

शब्द तारतात


शब्द  खुलवतात

शब्द झुलवतात


शब्द डोलवतात

शब्द कोलवतात


शब्द हरतात

शब्द जिंकतात


शब्द जागवतात

शब्द रागवतात


शब्द देतात

शब्द घेतात


शब्द मिरवतात

शब्द फिरवतात


शब्द फेकतात

शब्द झेलतात


शब्द झोडतात

शब्द मोडतात


शब्द फाडतात

शब्द जोडतात


शब्द कापतात

शब्द छापतात


शब्द वाचतात

शब्द लिहीतात


शब्द तापतात

शब्द झापतात


                 कवि

श्री. युवराज  गोवर्धन  जगताप

       काटेगाव ता :- बार्शी

           9405237081

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...