बुधवार, १७ मार्च, २०२१

नववर्षाचे स्वागत (कविता)

     नववर्षाचे स्वागत 


हर्षाची गुढी उभारू या

नववर्षाचे स्वागत करू या


भेदभाव मनीचे सोडून सारे

आपलेपणाने  वागू या

जाती भेद विसरून सारे

एकतेने  राहू या


वैर भावना सोडून सारे

एक दिलाने वागू या

मनातील अढी सोडून सारे

प्रेम भावनेने राहू या


रूढी जुन्या सोडून सारे

नाविन्याची कास धरू या

जीर्ण विचार सोडून सारे

नवसंकल्पनेने जगू या


अविचार सोडून सारे

जीवनात प्रकाश आणू या

अपयशी भावना सोडून सारे

प्रयत्नाने यश मिळवू या


अविवेक मनीचा सोडून सारे 

सद् विचाराचे बंध सांधू या

अमांगल्य सोडून सारे 

मांगल्याचे तोरण बांधू या



श्री. युवराज गोवर्धन जगताप

       काटेगाव ता:- बार्शी

        9405237081





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...