जन्मास येऊ द्या (अष्टाक्षरी रचना)
कसा खुडतो कोवळी
कळी नाजूक मुलीची
कशी करितो रे हत्या
पोटामधी रे जीवाची
नका दाबू माझा गळा
माय सोसते रे कळा
नका विझवू पणती
पसरेल अंधार काळा
जिथे वाढते स्त्रीभ्रूण
गर्भ मुलीचा पाडती
नसे अपत्य जयाशी
तेथे सारेच रडती
तुझा पुत्र अट्टहास
घेतो माझा श्वास घास
तुझ्या अंगणी येण्याची
मज आहे खूप आस
दिवा लावी दोन्ही घरी
मीच आहे सोनपरी
नको मारुस उदरी
येऊ दे रे तूझ्या घरी
मादी मी रे जन्मदात्री
माया,ममतेची छत्री
जिच्या पोटी घेता जन्म
मग का नको रे पुत्री
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता :-बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा