जीवन एक संघर्ष
काटेरी फुलांच्या
काट्यातून चालावं तसं
तप्त धुळीच्या
फुफुटयातून चालावं तसं
जीवन संघर्षमय असतं
उष्णतेनं धगधगुन
निघावं तसं
अग्निडोंबत होरपळून
निघावं तसं
जीवन संघर्षमय असतं
प्रलोभनाला बळी
पडावं तसं
भाकरीवर तुटून
पडावं तसं
जीवन संघर्षमय असतं
कोवळ्या उन्हात
न्हाऊन निघावं तसं
महागाईत भरडून
निघावं तसं
जीवन संघर्षमय असतं
वावटळीत कागदी तुकडा
सापडावं तसं
भुकेल्या सिंहाच्या तावडीत
सापडावं तसं
जीवन संघर्षमय असतं
कवि
श्री. युवराज गोवर्धन जगताप
(काटेगाव ता.बार्शी)
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा