"जीवन माझं"
जीवन माझं जळतयं
जीवन माझं होरपळतयं ।।धृ।।
नवऱ्याच्या दुराव्यानं
अविश्वासानं,मारपीटीनं ।।१।।
सासूच्या सासुरवासानं
जाचानं अन कारा- कारानं ।।२।।
सासऱ्याच्या शिवीगाळीनं
कुजकं बोलण्यानं ।।३।।
जावेच्या किरकिरीनं
कडवट बोलण्यानं ।।४।।
ननंदेच्या अंधुसलेपणानं
लावालावी,चाडबुचकेपनानं ।।५।।
दिराच्या चिडखोरीनं
अकारण अबोलपणानं ।।६।।
कवि
श्री. युवराज गोवर्धन जगताप (बार्शी)
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा