बुधवार, १७ मार्च, २०२१

कोरडा दुष्काळ (कविता)

 कोरडा दुष्काळ


तळ पाण्याने गाठला

पिण्या पाणी नाही थोडं

कोरड्याच नद्या तळी

कसं सोडवावं कोडं


पुरा हंगाम संपला

नाही पाऊस पडला

कुठे  असा रे दडला

कसा आम्हाला नडला


कोरडीला बी पेरलं

तवा पडलास थोडा

फुलं लागता पिकाला

कसा घातलास खोडा


गेलं गवत वाळून

नाही हिरवा हा चारा

पीक गेलंय जळून

उभा सुटलाय वारा


वाट पावसा पाहतो

आशा डोळ्यात नाचते

ढग पळतात पुढे

गंगा डोळ्यातून येते


आम्ही कसेबसे जगू

पोटी दोन घास भरू

मुक्या जीवाचे रे हाल

देवा सांग काय करू


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:-बार्शी

       9405237081



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...