बुधवार, १७ मार्च, २०२१

नववर्ष शुभेच्छा (कविता)

 "नववर्ष" शुभेच्छा


जुने संपले वर्ष

नव्या वर्षाची चाहूल

नव्या चा मनात हर्ष

नवर्षात पडो तुमचे पाउल


स्वप्ने सारी होवोत 

तुमची साकार

जीवनास मिळो तुमच्या

संपन्नतेतून छान आकार


विनाकारण नका करू 

काळजी व्यर्थ

प्रयत्नांची करा

तुम्ही अपार शर्थ


प्रामाणिक पणाची

धरा तुम्ही कास

नव वर्षात घ्या

एक एक मोकळा श्वास


तुमच्या जीवनात

येवो सुखाचा सागर

माया,प्रेम,वात्सल्याचा

करावा तुम्ही जागर


नववर्षाची उभारा

भगवी आनंदी गुढी

पारंपारिक कालबाह्य

सोडून द्या रूढी


पंखात येऊ द्या

उंच भरारी घेण्याचे बळ

काढून टाका साठलेला

जुना पोटातील मळ


घडोत तुमच्या हातून 

कार्य महान महान

महाराष्ट्राच्या मातीलाही

वाटावा तुमचा अभिमान


जीवन जगा असं

कोणी करणार नाही बोट

वागण्या बोलण्यात

तुमच्या नसावी खोट


जीवन तुमचे राहो 

सदाच आरोग्य दायी

तुम्हा साठी शब्द फुले 

वाहतो भगवंताच्या पायी



श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:-बार्शी

       9405237081





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...