मुलीचा गर्भ बोलतोय--(मुक्तछंद रचना)
सांग बा
मी तुझाच ना अंश
माय च्या गर्भात
नऊ महिने वाढणारा
तूच ना तो
बाप रुपी यम
गर्भ आहे मुलीचा
म्हणून गर्भ पाडणारा
मग सांग मला
तू यम की बाप?
मला गर्भातच मारून
कशाला करतोस
घडाभर महापाप
मला घाल जन्माला
तुझ्या घरात नांदेल
सुख शांती आपोआप
हे कसले हो बाप
यांना हवंय मूल
पण
तो असावा
वंशाचा दिवा
गर्भातच खुडतात
नाजूक कळ्या
होण्या अगोदरच फूल
सांग ना माय
तू का गप्प राहतेस
माझ्या जन्मासाठी
का नाही करत धाडस
नकोय का तुलाही
मुलगी रुपी पाडस
मुलीचे गर्भ
फेकले जातात
गटारीत नाल्यात
अन कोठेही
माझ्या खुनात
बरबटली तुझी बोटेही
मुलाच्या हव्यासापोटी
भ्रूण हत्या करताना
माय बापाच्या हाताला
का सुटत नाही कापरे
परमेश्वरा तूच आता
यांना चांगलाच झाप रे
ज्यांना नाही आपत्य
त्याच्या जीवाची होते लाही
मी जिच्या पोटी
जन्मावे म्हणते
तिथे मला संपवण्याची घाई
ईश्वरा माझे एकच मागणे
मला मारणाऱ्या बापाच्या
आपत्य सुखासाठी
आयुष्यभर डोळ्यातून
अश्रुधारा गळो
माय तुही होऊन वांझोटी
तुझ्याही गर्भाची कूस जळो
माय बाप हो
मुलगी म्हणून गर्भातच
मला मारू नका
मुलांनीच जन्मास येण्याचा
घेतलाय का हो ठेका
माझा जन्मोत्सव साजरा करून
संसारी जीवनात घ्या
आनंदाचा मायारुपी झोका
मला जन्माला घालण्याचा
घालवू नका सुंदर मोका
नाहीतर
तुमच्याच मुलांना नाहीत
मिळणार बायका
जाणून घ्या संभाव्य धोका
माय बाप हो
तुम्हीच आता भ्रूणहत्या रोखा
कवि
श्री. युवराज गोवर्धन जगताप
(काटेगाव ता.बार्शी)
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा