बुधवार, १७ मार्च, २०२१

अन्नदाता (कविता)

      अन्नदाता


तुझा नको सोडू बाणा

खेळ आहे जीवघेणा

नको मनी अविचार

तोंड देरे संकटांना


अन्नदाता तू जगाचा

साऱ्या जगाला पोसतो 

येवो कितीही संकटे

ठाक उभा रे राहतो


ओला सुका रे दुष्काळ

नित पाचवी पूजेला

तुझा जीव टांगणीला

दूर लोट संकटाला


रहा कष्ट रे करीत

कोप निसर्गाचा होवो

उठ मातीतून पुन्हा

नशिबी यश रे येवो


नको चिंता नको धास्ती

कर काळावर मात

नक्की सुखाची पहाट

तुझ्या होईल दारात


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:-बार्शी

       9405237081

दि:- ०९/१०/२०१८










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...