बुधवार, १७ मार्च, २०२१

अवकाळी (कविता)

     "अवकाळी"


आला वादळी वारा

घेऊन पाऊस अवकाळी

पहा दुःखच लिहिलंय का हो

आमच्या कपाळी

आता दुष्काळातून कसाबसा

होतो कुठं सावरलो

वादळी वारा अन

गारपीटीनं मात्र पुरता बावरलो

मनातून पोखरलोय अन

शरीरानं फक्त उरलोय

जीवनाच्या महाभारतात आता

कौरवासमान लढून लढून हरलोय

आयुष्याच्या वळणावर कर्जाच्या

डोंगराकडे पाहून आता मात्र घाबरलोय

मुलाचं शिक्षण अन मुलीचं लग्न

याच्या चिंतेने पुरता झुरलोय

निसर्ग अन सावकारी कर्ज

यापुढं हतबल झालोय

निराशेच्या पोटी जीवनाचा अंत

करून आता

शरीरानं सुद्धा जीवन वाटेवरून संपलोय

उद्या निवडणुकांचा सुटेल वारा

घोषणांच्या गारांचा पडेल सडा

मदतीच्या होतील घोषणा अवकाळी

पण दिसणार नाही

अन्नदात्या मातेच्या कुंकू कपाळी


                  कवि

श्री. युवराज गोवर्धन जगताप (बार्शी)

              9405237081

        





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...