बुधवार, १७ मार्च, २०२१

१८ च्या आत नको लग्न (कविता)

 १८ च्या आत नको लग्न


मुलगी लवकर शहाणी झाली

बानं लग्नाची घाई केली


मुलीचं वय झालं होतं चौदा

बापानं केला तिचा सौदा


झालं लगीन तिचं मांडवात

दिस गेलं दोन महिन्यात


तिकडे बाला आनंद झाला

माझा मुलगा बाप होणारं


इकडं बाला आनंद झाला

माझी मुलगी आई होणार


दिस पुरतं सरत आलं

तिला दवाखान्यात भरती केलं


तिचं बाळंतपण झालं

तिला काळानं वरती नेलं


पोर हातावीनं जन्माला आलं

तिनं नाही त्याला पाहिलं


बाळ दोन दिसही नाही जगलं

आई बापाला झालं दुःख

काय केलं होतं आम्ही पाप


म्हणून सांगतो मंडळी

अठरा च्या आत मुलीचं नको लग्न

आई होण्यात येतं विघ्न  


               कवि

श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:-बार्शी

       9405237081


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...