बुधवार, १७ मार्च, २०२१

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना)


पाऊस भेट

तप्त मातीशी होता

हर्षली लता


गंध मातीचा

कस्तुरीसम वाटे

तनात दाटे


मृदा सुगंध

तन मना भुलवी

जीव फुलवी


गंधी हासली

तरू,पशु ,पाखरे

तृप्त लेकरे


रानी सुवास

घुमे अत्तरा परी

साऱ्या शिवारी


श्री.युवराज गोवर्धन जगताप

      काटेगाव ता:-बार्शी

        9405237081




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...