साथ तू देताना---
साथ तू देताना
मी तुझ्यात गुंग
होऊनी बेभान
जसा वारा वाहे
रानात तुफान
साथ तू देताना
फुलला आपला
संसाराचा गाडा
विश्वासास कधी
नाही गेला तडा
साथ तू देताना
वाळल्या गवता
फुटले तगारे
रुक्ष जीवनास
स्वप्नांचे घुमारे
साथ तू देताना
आशेची फुटली
पालवी कोवळी
दुःखाचा डोंगर
घाली पायदळी
साथ तू देताना
नाही बाळगली
कसलीच तमा
संसार आपला
सुखातच जमा
कवि
श्री. युवराज गोवर्धन जगताप
(काटेगाव ता.बार्शी)
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा