"पायाची आग"
माय तुझ्या पायाची
होत असल आग
निर्दयी सरकारला
कशी येईना जाग
माय तुझ्या पायाची
जखम किती खोल
शब्द देऊन सरकार
फिरवतय गोल गोल
माय निशाण लाल झेंड्याची
हाती तुझ्या भक्कम
भोळी भाबडी आशा तुझी
सरकार देईन मदतीची रक्कम
माय तुझ्या पायाची
कातडी जरी फाटली
मोर्चातून तू मात्र
माघारी नाही हटली
कमाल तुझ्या पायाची
वेदनेसह मुंबई केली सर
भला मोठा विश्वास तुझा
मायबाप सरकारवर
कवि
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता :- बार्शी
940523781
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा