ओझं कर्जाचं
नाही वाफलं शेतात
दानं पेरून तुरीचं
किती सोसाव्या यातना
ओझं झालंय कर्जाचं
कर्ज काढून आणलं
केली पेरणी दुबार
हाती नाही काही आलं
पैसा गेला रे मोकार
कर्ज काढून काढून
आलं भिकेचे डोहाळे
दुःखी लेकरु चेहरा
माझं काळीज रे जळे
करी मदत मागणी
हात शासनाचे वरी
कसे जगावे जीवन
देहा नापिक डागणी
झालो कर्जानं लाचार
मन उदास उदास
कसा हाकलू संसार
येतो फाशीचा विचार
दाता कसला अन्नाचा
आहे मीच रे उपाशी
देवा नको पाहू सत्व
देरे उभारी मनाशी
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:-बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा