बुधवार, १७ मार्च, २०२१

मोबाईलचं वेड (कविता)

 "मोबाईलचं वेड"


मोबाईलचं वेड तुला 

लयं लागलंय बाई

माझ्यासाठी थोडा 

वेळ दे ना आई      ।।धृ।।


चार्जिंगला लावून दे

मोबाईल ला फास

माझ्यासाठी सोडून दे

मोबाईल चा ध्यास      ।।१।।


मोबाईल चा लई बाई

लागलाय तुला लळा

बाजूला ठेऊन त्याला

दोन घास भरव बाळा  ।।२।।


मोबाईलवर सदा 

असते तू अन ताई

शाळेत जाण्या- आवरण्याची

माझी होते घाई            ।।३।।


दिनरात मोबाईल 

असतो तुझ्या उशाला

हाका मारून कोरड 

पडते माझ्या घशाला   ।।४।।


आज घरी येताना

मोबाईल दे फेकून

बोट माझं धरून

चाल जरा वाकून        ।।५।।


मोबाईल चा शोध जर

लागला नसता  बाई

कडेवर घेतलं असतं

तू मला आई               ।।६।।



                कवि

श्री. युवराज गोवर्धन जगताप (बार्शी)

         9405237081

        




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...