ओला दुष्काळ (हायकू)
ओला दुष्काळ
निसर्गाची करणी
पाणीच पाणी
ओला दुष्काळ
पिकं झाली पिवळी
जीवन जाळी
ओला दुष्काळ
पावसाचा कहर
वर्षा लहर
ओला दुष्काळ
संसार रे पाण्यात
अश्रू नेत्रात
ओला दुष्काळ
रान हिरवे पाही
खायला नाही
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:- बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा