बुधवार, १७ मार्च, २०२१

काळी आई (कविता)

      "काळी आई"


तुझ्या काळ्या मातीत

किती कसावं कसावं

तू नाही दिला दाना म्हणून

कसं रुसावं रुसावं---------


ढगा येईना बघ राग

मज देहाची होतेय आगं

ढग देईना टिपूस टिपूस

कसा पिकलं हापूस- कापूस ---


माझी तिफण शेतात 

किती  जोमानं जोमात

नाही वाफलं शेतात पिकं

किती शेतात खपावं खपावं-----


माझं राबती शेतात हात

किती घामानं भिजावं

नाही पिकलं दानं म्हणून

कसं उपाशी निजावं----


तुला येउ दे आई रागं

माझ्या घामानं फुलवं बाग

रास बघून धान्याची 

माझं लेकरू हासलं-------


                 कवि

श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:- बार्शी

       9405237081




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...