विद्याधन (अष्टाक्षरी रचना)
साऱ्या धनात रे श्रेष्ठ
आहे बाबा विद्याधन
करा संचय विद्येचा
बना ज्ञानाने संपन्न
करा गोळा ज्ञान कण
किती येवोत संकटे
वाचा पुस्तके अफाट
खुडा अज्ञानाचे काटे
विद्येविना नाही मान
विद्येविना नाही गती
विद्या हीच आहे शान
विद्या करते प्रगती
कणा कणातून विद्या
मार्ग प्रगतीचा दावी
झेप यशाच्या शिखरी
ज्ञान संपादून घ्यावी
ज्याच्या ठायी विद्याधन
तोची जगात श्रीमंत
ज्ञान अमृत पिवूनी
बना गुणी ज्ञानवंत
ज्ञान मशाली पेटवा
करा ज्ञानाचा जागर
घ्यावा ज्ञानामृत रस
भरा विद्येची घागर
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:-बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा