बुधवार, १७ मार्च, २०२१

भंगारवाला -स्वच्छता दूत (कविता)

            चित्र काव्य


 भंगारवाला - स्वच्छता दूत


फिरे गावोगावी जीव

गोळा करीत भंगार

धारा अंगात घामाच्या

डोई उन्हाचा अंगार


पत्रा लोखंड प्लॅस्टिक

दारी जाऊन जमवी

पैसा अडका थोडासा

त्याला विकून कमवी


चाले संसार तयाचा

याच भंगारा वरती

दिस उगवता चालू

उन्हा तान्हात फिरती


पोट खळगी भरण्या

सायकल दूर फिरे

ओझी वाहून वाहून

झिजे आयुष्य रे सारे


बांधी गाठोडे वेगळे

तुझा स्वभाव हा जिद्दी

ओझे सायकल मागे

किती जमवली रद्दी


वस्तू नव्याने बनती

जमा भंगार मधून

करी परिसर सेवा

स्वतः कष्टाला वाहून


घाण घरातील कमी

होते  देताच भंगार

घर परिसर स्वच्छ

करी स्वच्छता जागर


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:-बार्शी

    9405237081








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...