बुधवार, १७ मार्च, २०२१

रक्षाबंधन (अष्टाक्षरी रचना)

   रक्षाबंधन (अष्टाक्षरी रचना) 


आला श्रावण सणाचा

सण हो माझ्या भावाचा

राखी बांधण्या बहीण

धरी रस्ता माहेराचा


वेड्या बहिणीची माया

ओढ भेट भाऊराया

हवी तिला तुझी छाया

झिजविते तिची काया


संगे घेऊनी लेकरं

गाठी तुझेच रे घर

उभा दारात पाहुनी

भावा दाटे तिचा उरं


हाती घेऊनी आरती

भाळी कुंकू टिळा लावी

ओवाळीते भाऊराया

तुझी प्रगती रे व्हावी


सुख शांती नांदो घरी

शुक्र ग्रह दृष्टी दारी

भाळी अक्षदा रे लावी

मनी कामना रे उरी


बांधी बंधनाचा धागा 

राखी बांधते रे हाती

रक्षा कर माझी भावा

ठेवी आशा जपे नाती


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता :- बार्शी

     9405237081













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...