मैत्री
मैत्री म्हणजे निव्वळ
पाण्याचा निर्मळ झरा
मनातील गुपितं उघड
सांगणारा धुंद वारा
मैत्री म्हणजे धुंद
वाऱ्यावरील झोका
नाते रक्ता पलीकडचे
नाही होणार धोका
मैत्री म्हणजे आनंद
गगनाला भिडणारा
सांकव दोन हृदयाना
विनाअट जोडणारा
मैत्री म्हणजे जीवास
माया देणारा जीवन धागा
असलो दूर परी हृदयात
दोघांच्याही मित्रास जागा
मैत्री म्हणजे मनातील
सुखद अंतरीचा कप्पा
जिथं होतात मन मोकळी
चालतात विविधांगी गप्पा
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता :- बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा