बुधवार, १७ मार्च, २०२१

झळ दुष्काळाची (कविता)

        झळ दुष्काळाची


झळ दुष्काळ लागली

बैलं दावणीत मेली

कोण ओढील रे आता

बैलगाडी ही आपली


नाही कशाचीच पर्वा

ओढू जुंपून ही गाडी

कष्ट करीतच राहू

किती तुटोत आतडी


चल होऊ बैलं दोघं

घेऊ आपण जुंपून

नाही तमा रे कशाची

टाकू कामहे संपून


बैलं आठवती मनी

डोळा गाळती रे पाणी

दोघे होऊ सर्जा राजा

चल तू माझी गं राणी


गाडी ओढून निघतो

साऱ्या अंगातून घाम

कष्ट केल्यापरी नाही

कोणा मिळत रे दाम


आहे जगण्याची आस

जीवा किती होवो त्रास

काळ घेतोय परीक्षा

सोसू दोघे वनवास


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:-बार्शी

    9405237081




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...