संघर्ष
जन्मताच रे संघर्ष
पाचवीला हा पुजला
सारा समाज पुरता
जाति भेदानं सुजला
जात जन्मतः चिकटे
सुरू जीवन संघर्ष
अंगी फाटके तुटके
संपे मनातील हर्ष
बाप दिनरात राबे
स्वतः उपाशी राहून
चक्षू गाळी अश्रुधारा
त्यांचा संघर्ष पाहून
अन्न घास मिळविण्या
रोज शरीर कष्टते
वस्त्र, निवारा यासाठी
तन आमचे तिष्टते
जरी आली अंतवेळ
वारा संघर्षाचा वाहे
कसा देवही माझ्याच
अंत परीक्षेचा पाहे
दर पावली संघर्ष
आलो झुंजत तयाशी
देवा आता तरी यश
देना माझ्या रे हाताशी
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:-बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा