बुधवार, १७ मार्च, २०२१

शब्दची माझे (कविता)

 शब्दची माझे


शब्दची माझी आस

शब्दची माझा श्वास

शब्दफुलांचा सुवास

शब्दची माझे---------


शब्दची माझा घास

शब्दची माझी रास

काव्य निर्माणचा ध्यास

शब्दाची माझे---------


शब्दची माझी शब्दवृष्टी

शब्दची माझी दृष्टी

निसर्गरम्य शब्दांची सृष्टी

शब्दची माझे ----------


शब्दची माझे बळ

शब्दची अंतरीची कळ

काढि समाज मनातील मळ

शब्दची माझे -------------


शब्दची माझे कोठार

काव्यांगणाचे पठार

वैगुण्यावर शब्दवार

शब्दची माझे --------


शब्दची माझा सहारा

शब्दची माझा सुर वारा

अनिष्ठ प्रथावर मारा

शब्दची माझे -------


शब्दची माझा धीर

शब्दची माझे वीर

अन्यायावर प्रहार

शब्दची माझे --------


          कवि

श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:- बार्शी

       9405237081


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...