बुधवार, १७ मार्च, २०२१

वसंत (कविता)

         वसंत


रवीच्या सोनेरी

किरणांची नवी उषा

आला वसंत

घेवूनी नव्या आशा


पान गळीचा

वाजवून सळसळ ताशा

पाना पानातून

नवतीच्या नव्या भाषा


हिरव्या रंगानी

उजळल्या दाही दिशा

वसंत मोहरानी

पसरला आनंदी हशा


झाडांना चढली

हिरवी तजेल नशा

नव पालवीच्या

फुटल्या कोवळ्या रेषा


श्री. युवराज गोवर्धन जगताप

       काटेगाव ता:- बार्शी

        9405237081


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...