बुधवार, १७ मार्च, २०२१

बाप (शेलकाव्य)

  बाप (शेलकाव्य)


माझा शेतकरी बाप

बाप पोशिंदा जगाचा

राब राबतो मातीत

मातीत पाट घामाचा


त्याच्या घामातून फुले

फुले वावरात पिकं

नाही मागायचा कधी

कधी कोणाला रे भिक


कर्ज काढुनी संसार

संसार करी नेटका

कर्ज घेई जीव त्याचा

त्याचा पदर फाटका


होवो यातना रे किती

किती उरो कर्जबाकी

किती येवोत संकटे

संकटे गाडून टाकी


बाप माझा हरी काळा

काळा मातीत राबतो

आली आपत्ती तरी तो

तो धैर्याने तोंड देतो


बाप वरून नारळ

नारळ आतून गर

नसे कोणी त्याच्या पाठी

पाठी देई सदा धीर


श्री.युवराज गोवर्धन जगताप 

     काटेगाव ता :-बार्शी

     9405237081



बाप (शेलकाव्य)


माझा शेतकरी बाप,बाप पोशिंदा जगाचा

राब राबतो मातीत,मातीत पाट घामाचा


त्याच्या घामातून फुले,फुले वावरात पिकं

नाही मागायचा कधी,कधी कोणाला रे भिक


कर्ज काढुनी संसार,संसार करी नेटका

कर्ज घेई जीव त्याचा,त्याचा पदर फाटका


होवो यातना रे किती,किती उरो कर्जबाकी

किती येवोत संकटे,संकटे गाडून टाकी


बाप माझा हरी काळा,काळा मातीत राबतो

आली आपत्ती तरी तो,तो धैर्याने तोंड देतो


बाप वरून नारळ,नारळ आतून गर

नसे कोणी त्याच्या पाठी,पाठी देई सदा धीर


श्री.युवराज गोवर्धन जगताप 

     काटेगाव ता :-बार्शी

     9405237081

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...