कविवर्य नारायण सुर्वे याच्यावर
लिहलेली माझी कविता
नारायण
कोण माय माऊली ती
जीनं टाकलं उघड्यावर
बाळ तान्हं
तोची --- नारायण नारायण
गंगारामानं उचलिलं तन
अनं केलं संगोपन
पुरं केलं चौथीचं शिक्षण
तोचि – नारायण नारायण
देवानं केलं रक्षण
काव्याचं दविलं कुरण
शब्दमागे फिरला वणवण
काव्य बनलं जीवन
तोचि--- नारायण नारायण
भारत माता होती इंग्रजांकडं गहाण
स्वातंत्र्याची लागली होती तहान
काव्यानं पेटविलं भारतीयांचं मनं
तोचि ---नारायण नारायण
नराचा झाला नारायण
मराठी भाषेनं दिलं दान
काव्यानं फुलविलं विरान माळरान
तोचि --- नारायण नारायण
धन्य ती माय माऊली
जीनं दिला पुतर महान
त्याचं नाव नारायण
तोचि – नारायण नारायण
कवि
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता :- बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा