बुधवार, १७ मार्च, २०२१

आला श्रावण(अष्टाक्षरी रचना)

 आला श्रावण(अष्टाक्षरी रचना)


आला पाहुणा श्रावण

संगे पावसाची धार

मनी आनंद दाटला

वारा नाचे जणू नार


धारा श्रावणाच्या येती

उल्हासीत होई मन

काळ्या नभी इंद्रधनू

करी छानशी कमान


ऊन पावसाचा खेळ

रवि लपतो ढगात

हिरवळ शालूवरी

काढी नक्षी रे वेगात


माथी उजाड डोंगर

नेसे मखमली साज

दवं मोत्यांचे पसरे

कसा सजला तो आज


आला श्रावण शिंपित

जल मोत्यांच्या रे धारा

हिरवाई रंगे रानी

पशु पक्षी मिळे चारा


आला श्रावण घेऊनी

मांदियाळी रे सणांची

नटे तरु,वृक्षवल्ली

जणू दिवाळी रे त्यांची


                कवि

श्री. युवराज गोवर्धन जगताप

        (काटेगाव ता.बार्शी)

         9405237081


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...