संसार
संसार म्हणजे ---
गोपाळ वावर
दुःखाची घागर
सुखाचा सागर
संसार म्हणजे ---
जणू बैलगाडी
नवऱ्याची माडी
बायकोची साडी
संसार म्हणजे ---
देने अन घेणे
रोज तजवीज
पोटाची करणे
संसार म्हणजे ---
लेकराची शाळा
पैसे करा गोळा
नीतिमत्ता पाळा
संसार म्हणजे ---
नातलग मेळा
आनंदाचा मळा
संपत्तीचा ताळा
संसार म्हणजे ---
मुलांचा सांभाळ
कष्टाचं आभाळ
सुखाचा सुकाळ
संसार म्हणजे ---
भविष्य विचार
चांगले आचार
जीवन बाजार
संसार म्हणजे ---
आई बाप सेवा
मिळे तुम्हा मेवा
दुनियेस हेवा
कवि
श्री. युवराज गोवर्धन जगताप
(काटेगाव ता.बार्शी)
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा