कळी(हायकू रचना)
गुच्छ पाकळ्या
बांधुनी एक मोळी
जन्मते कळी
नाजूक कळी
गर्द हिरव्या पानी
सुगंध गाणी
कोवळी कळी
नवं चैतन्य आशा
सजल्या दिशा
मोहक कळी
उमलण्या आतुर
चक्षु फितूर
खुलता कळी
सुगंधी फुल होई
सौन्दर्य देई
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:-बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा