बुधवार, १७ मार्च, २०२१

बाप माझा (कविता)

      बाप माझा


जिवा भावाचा मित्र

कुटुंबाचं मुख चित्र

डोईचं भक्कम छत्र

बाप माझा ------


कुटुंबाचा आधार

सोसतो प्रपंचाचा भार

माझ्या स्वप्नाचा बाजार

बाप माझा -----


संकटातील पाठीराखा

सांगतो नीट वागा

करीत नाही त्रागा

बाप माझा ------


प्रयत्नाला देतो बळ

चुकीला कानाखाली वळ

पोटात नाही मळ

बाप माझा ----


सखा अन सोबती

दिनरात हात त्यांचे राबती

कशी वर्णावी महती

बाप माझा --------



                    कवि

श्री.युवराज गोवर्धन जगताप

      काटेगाव ता :- बार्शी

        9405237081


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...