कवी-- मी
शब्दांनी बनवितो
काव्य शब्दांचा हार
शब्दांनीच करितो
समोरच्यास गार
कवी - शब्दांचा भुकेला -मी
शब्दमागे फिरतो
होवून मी वेडा
समस्यांवर शब्दातून
ओढतो ओरखडा
कवी - शब्दांचा भुकेला -मी
शब्दांचा ओढतो मी
छंद रुपी गाडा
काव्याचा बांधीतो सुंदर
चिरेबंदी वाडा
कवी - शब्दांचा भुकेला -मी
शब्दांतून मांडतो
वास्तवतेचे चित्र
शब्दांनाच बनवले मी
माझे खास मित्र
कवी - शब्दांचा भुकेला -मी
शब्दांतून करतो
समाज मनावर घाव
कवितेचा भुकेला मी
शब्द घेतात माझ्याकडे धाव
कवी - शब्दांचा भुकेला -मी
कागदावर पेरतो
शब्दांची रांग
किती फिरावे शब्दांपाठी
कविते तूच सांग
कवी - शब्दांचा भुकेला -मी
शब्द भागवतात
माझी भूक,तहान
शब्दचं बनवतील
मला कवितेतून महान
कवी - शब्दांचा भुकेला -मी
कवि
श्री.युवराज गोवर्धन, जगताप (बार्शी)
9405237081
स्पर्धेसाठी
कवी - शब्दांचा भुकेला -मी
शब्दांनीच बनवितो
काव्य शब्दांचा रे हार
शब्दांनीच करितो मी
समोरच्या लोका गार
शब्दामागे फिरतो
मीच होवूनिया वेडा
समस्येला शब्दातून
ओढी खोल ओरखडा
शब्द वेडा ओढतो मी
छंद रुपी काव्य गाडा
कवितेचा बांधीतो मी
छान चिरेबंदी वाडा
शब्दांतून मांडतो रे
वास्तवता काव्य चित्र
शब्दांनाच बनवले मी
माझे सच्चे खास मित्र
शब्दांतून करी साऱ्या
समाजाच्या मनी घाव
कवितेचा भुकेला मी
शब्द घेती माझा ठाव
शुभ्र कागदी पेरतो
काळ्या शब्दांची ही रांग
किती फिरु शब्दांपाठी
काव्यमाय तूच सांग
शब्द भागवतात
माझी भूक नी तहान
हेच शब्द कवितेचे
मला बनवी महान
कवि
श्री.युवराज गोवर्धन, जगताप
काटेगाव ता :- बार्शी
जिल्हा:- सोलापूर
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा