ओला दुष्काळ
झाला पावसाळा सुरू
सारा शिवार पाण्यात
रोज बरसते वर्षा
नाही जीव रे जीवात
झड पावसाची लागे
शेत बराबरा करी
घोर जीवा शेतकरी
थाप तनाची वावरी
पाय टाकता फसतो
उडे पिचकारी वर
शेती पाण्यात बुडाली
कसे चालवावे घर
बीज शेतात पेरलं
मनी सपानं पाहिलं
केला कार पावसानं
पिकं पिवळं पडलं
सारा शिवार पिवळा
जणू कावीळ झालीय
आहे मुबलक पाणी
कशी वेळ ही आलीय
ओला दुष्काळ दुष्काळ
चारा जनावरा मिळे
फट फजिती माणसा
पोट अन्नासाठी जळे
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:-बार्शी
9405237081
दि:-०७/१०/२०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा