बुधवार, १७ मार्च, २०२१

चेहरे (मुक्तछंद)

 चेहरे (मुक्तछंद)


चेहरे हसरे

चार माणसात बसवणारे

अन

माणसातून उठवणारेही

चेहरे रंग बदलणारे

सारड्याप्रमाणे

समोरच्यास भुलवणारेही

चेहरे लाजरे बुजरे

लाजेने ओशाळणारे

मनास

आतून पोखरणारेही

चेहरे मखमली सुंदर

मनास वेडावणारे

वेडे करून सोडणारेही

चेहरे फसवणारे

आस मनी लावणारे

प्रसंगी फसवून

फास लावणारेही

चेहरे उदास

मन खिन्न करणारे

आभाळ कोसळल्यागत

दुःख भासवणारेही

चेहरे दुःख लपवणारे

बळजबरी हास्य पांघरलेले

यातना लपवणारे

कातडी झाकलेले

चेहरे रडवे

दुःख अश्रूतून वाहणारे

वेदनेच्या डागण्या

हृदयी देणारेही

चेहरे आनंदी

सुख शांती देणारे

अन

प्रसन्नतेचे अथांग सागरही


                   कवि

श्री. युवराज गोवर्धन जगताप

        (काटेगाव ता.बार्शी)

          9405237081






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...