बुधवार, १७ मार्च, २०२१

भास (दर्पण काव्य)

  भास (दर्पण काव्य)


भास

तुझ्या येण्याचा


भास

नयनातील तिरप्या प्रेमळ नजरेचा


भास

नजरेत खुललेल्या प्रेमाच्या नाजूक हळुवार कळीचा


भास

नखशिखांत शरीरात भरलेल्या रसरशीत जवानीतील ठसठशीत

रूपवान देहाचा


भास

देहात उठलेल्या बेभान झालेल्या तुफानी भावनांच्या सागरातील उसळणाऱ्या मिलनाच्या लाटेचा


भास


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता :- बार्शी

     9405237081









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...