बापूजीची पंचसूत्री
साधी जयांची राहणी
उच्च तयांचे विचार
कास धरून सत्याची
शुद्ध ठेविले आचार
मार्ग अहिंसा धरुनी
लढा इंग्रजांशी दिला
बंड करुनी उठले
देश स्वतंत्र हा केला
वाममार्ग रे सोडूनी
रस्ता अस्तेय दाविला
शांत सयंमी महात्मा
राष्ट्रपिता रे जाहला
शील ठेविले सुंदर
नाही लागू दिला डाग
ब्रम्हचर्य रे पाळून
मनी फुलवली बाग
साठा संपत्ती पैशाचा
नका करू कोणी आता
वाट रे अपरिग्रह
हाच दाखवी विधाता
स्मृती जागवू अंतरी
होती विभूती महान
माथा ठेवुनी चरणी
गाऊ त्यांचे गुणगान
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:-बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा